ग्रामपंचायतीची कामे

  • गावामध्ये रस्ते बांधणे.
  • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
  • दिवाबत्तीची सोय करणे.
  • जन्म,मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे.
  • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
  • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
  • शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे.
  • रोजगार, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
  • गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवणे.

सरपंचाची कामे –

  • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
  • गावाची स्वच्छता राखणे.
  • वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
  • गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला) इ.
  • गावचा सर्वांगीण विकास करणे.
  • गावातील लोकाना मुलभूत सेवा पुरवणे.

सदस्यांची कामे –

  • सदस्यांनी आप-आपल्या वार्डाकडे नियमित लक्ष देणे.
  • वार्डातील समस्या आपल्या पध्दतीने सोडववणे.
  • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
  • वार्डाची स्वच्छता राखणे. इ.

ग्रामसेवकांची कामे –

  • गावात आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचे आदरातिथ्य करणे.
  • ग्रामस्थांना शासकीय नियम अवगत करून देणे.
  • आवश्यक उतारे व दाखले यांच्या सुविधा पुरवणे.
  • ग्रामपंचायत कर वसुली करणे.
  • शासकीय योजना ग्रामास्थापर्यंत पोहचवणे.
  • गावकरी मंडळींना नव-नविन सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करणे. इ.

तलाठीचे कामे –

  • सातबारा उतारा देणे.
  • पंचनामा करणे.
  • रहिवासी दाखला देणे.
  • इतर शेती संबंधी कागदपत्र.
  • जमीन नावे लावणे. इ.

पोलिस पाटीलचे कामे –

  • गावात सु-व्यवस्था ठेवणे.
  • पोलिस पाटील यांचे कडील रहिवासी दाखला देणे. इ.

Loading

× Chat Here